जिल्हा

श्रीराममारुती महाराज मंदिरात रामजन्मोत्सव व जानकीआई पुण्यतिथी

श्रीराममारुती महाराज मंदिरात रामजन्मोत्सव व जानकीआई पुण्यतिथी
श्रीराममारुती महाराज मंदिरात रामजन्मोत्सव व जानकीआई पुण्यतिथी फोटो: ठाणे वैभव
कल्याण : सालाबादप्रमाणे याहीवेळेस जूना दूध-नाका कल्याण पश्चिम येथील अतिशय जागृत व प्रसिद्ध असलेल्या योगिराज समर्थ सद्गुरु श्रीराममारुती महाराजांच्या समाधी मंदिरात रामजन्मोत्सव  तसेच प.पू जानकीआईचे ८० व्या पुण्यतिथी उत्सव निमित्ताने धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी रामनवमीचे दिनी सद्गुरू संत माऊली राममारुती महाराजांच्या समाधीवर, श्रीराम पंचायतनावर व जानकी आईंचे मुर्तीवर पंचामृत महाअभिषेक संस्थानचे अध्यक्ष व विश्वस्त शिरीष गडकरी व शितल गडकरी यांचे हस्ते करुन या सोहळ्याला सुरुवात करण्यात आली.
तदनतंर राममारुती महाराज स्तवन महात्म्य, सावली पोथीतील अकराव्या अध्यायाचे सामूहिक पठण करण्यात आले. त्यानंतर अनेक स्त्री-पुरुषांच्या सहभागाने चैत्रगौरी व जानकी आईंचे प्रतिमेवर कुंकूमार्चनाचा सोहळा पार पडला.यावेळी पौराहित्य  आदित्य गुरुजी व मधुर गुरुजी यांनी केले.
या प्रसंगी ह.भ.प. कुमारी मधुरा संदिप लिमये, कल्याण यांचे श्री रामजन्मावर सुश्राव्य किर्तन होऊन  फुले उधळून राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.आपल्या ओघवत्या वाणीत त्यांनी जानकी आईंचे अल्प चरित्राचेही वर्णन केले. त्यानंतर महाआरती झाल्यावर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी दुपारी कुंदा उगले यांचे नेतृत्वाखाली विठ्ठल मंदिर महिला भजनी मंडळाचे वतीने सामुहिक श्री सप्तशती पाठाचे पठण करण्यात आले. सायंकाळी ज्ञानेश्वरी महिला मंडळातर्फे बारावेळा रामरक्षा पठण करण्यात आले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475