जिल्हा
राज ठाकरे कल्याणमध्ये मनसे उमेदवारांच्या भेटीला
राज ठाकरे कल्याणमध्ये मनसे उमेदवारांच्या भेटीला
फोटो: ठाणे वैभव
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील पूर्ण ताकदीने उतरली असून मनसेच्या उमेदवारांना भेट देण्याकरीता आणि मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कल्याणमध्ये धावती भेट दिली.
यावेळी राज ठाकरे यांच्या हस्ते कल्याण पश्चिमेतील मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पहायला मिळाली. तर राज ठाकरे उमेदवारांच्या भेटीला आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475