महाराष्ट्र

भिवंडीच्या भाजीपाला मार्केटमध्ये साचले पावसाचे पाणी

भिवंडीच्या भाजीपाला मार्केटमध्ये साचले पावसाचे पाणी
भिवंडीच्या भाजीपाला मार्केटमध्ये साचले पावसाचे पाणी फोटो: ठाणे वैभव
भिवंडी: भिवंडीत आज दुपारनंतर झालेल्या अर्ध्या-पाऊण तासाच्या पावसाने शिवाजीनगरमधील भाजीपाला मार्केटमध्ये पाणी साचून जाण्या-येण्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाला. तर भाजीपाला विक्रेत्यांचे नुकसान झाले. शहरात पावसाळ्याची अजून फारशी सुरुवात देखील झाली नाही तरी शहरात ठिकठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार सुरु झाले. महानगरपालिकेने नाले व गटार सफाई करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचे ठेके दिले आहेत. मात्र ठेकेदारांकडून पालिकेच्या स्वच्छता विभागातील मुकादम व आरोग्य निरीक्षक योग्यप्रकारे काम करून घेत नसल्याने पावसाचे पाणी योग्यरीत्या प्रवाहित न होता ठिकठिकाणी साचून राहिले आहे. शिवाजीनगर येथील भाजीपाला मार्केट हे शहराच्या प्रमुख नाल्याच्या स्लॅबवर भरत आहे. नाल्यातील पाणी प्रवाहित न झाल्याने हे पाणी रस्त्यावर साचून भाजी विक्रेत्यांचे नुकसान झाले. तर या भागात मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य झाले आहे. त्यामुळे सायंकाळी भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांना जाता आले नाही.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475