जिल्हा

राहुल कर्डिले सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी

राहुल कर्डिले सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी
राहुल कर्डिले सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई : राहुल कर्डिले, भाप्रसे यांनी सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार पूर्वीचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोले यांच्याकडून ३१ डिसेंबर २०२४ रोजी सिडको भवन येथे स्वीकारला. राहुल कर्डिले हे सन २०१५ च्या तुकडीतील महाराष्ट्र कॅडरचे भारतीय प्रशाकीय सेवा (आयएएस) अधिकारी आहेत. श्री. राहुल कर्डिले हे अभियांत्रिकी (इन्स्ट्रुमेन्टेशन) पदवीधर आहेत. यापूर्वी त्यांनी अधिसंख्य सहाय्यक जिल्हाधिकारी, अमरावती, सहाय्यक जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी, सेलू, जि. परभणी, मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रपूर जिल्हा परिषद आणि सहआयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), मुंबई ही पदे भूषवली आहेत. सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी राहुल कर्डिले हे जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी, वर्धा म्हणून कार्यरत होते.वर्धा येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना राहुल कर्डिले यांनी तालुका स्तरापर्यंत ई- कार्यालय या उपक्रमाची अंमलबजावणी केली होती. ई-कार्यालय उपक्रमाची तालुका स्तरापर्यंत अंमलबजावणी करणारा वर्धा हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरला होता. सेवादूत उपक्रमांतर्गत ग्रामस्तरीय उद्योजका (व्हीएलई) मार्फत ऑनलाइन प्रक्रिया राबवून नागरिकांना घरपोच सेवा देण्याचा पथदर्शी प्रकल्पही त्यांनी राबविला होता. नागरिकांकरिता ९० अधिकच्या सेवा अधिसूचित करणे, ९० सेवांपैकी २७ सेवा या ऑनलाइन आरटीएस पोर्टलच्या माध्यमातून त्यांनी उपलब्ध करून दिल्या होत्या. तसेच वर्धा जिल्ह्यातील ९६ दुष्काळी गावांतील ९० कि.मी. च्या नाल्याचे खोलीकरण व नाल्याच्या काठाने बांबूची लागवड, वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न इ. उपक्रम त्यांनी वर्धा येथे राबविले होते.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475