जिल्हा

मीरा-भाईंदर महापालिका आयुक्तपदी राधाबिनोद शर्मा

मीरा-भाईंदर महापालिका आयुक्तपदी राधाबिनोद शर्मा
मीरा-भाईंदर महापालिका आयुक्तपदी राधाबिनोद शर्मा फोटो: ठाणे वैभव
भाईंदर: मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी महापालिका आयुक्तपदी राधाबिनोद शर्मा या एमएमआरडीएतील सह आयुक्तपदी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. व्ही. राधा, अप्पर मुख्य सचिव यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. नवी मुंबई सिडको येथे आयुक्तपदी कार्यरत असताना ९ ऑगस्ट २०२३ रोजी मीरा-भाईंदर महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेल्या संजय काटकर यांनी संध्याकाळी महापालिका आयुक्त पदाचा पदभार स्विकारला होता. अवघ्या दीड वर्षाच्या काळात संजय काटकर यांनी धडाकेबाज निर्णय घेत महापालिकेचा आर्थिक डोलारा सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र नाविन्यता कक्षासह काही वादग्रस्त निर्णयामुळे आयुक्त काटकर यांना काही राजकीय रोषाला सामोरे जावे लागले. नाविन्यता कक्षातील नियुक्त्यांना शासनमान्यता नसल्याने तसेच दरमहा सुमारे १५ लक्ष रुपये या तैनाती फौजेसाठी खर्च होत असल्याने प्रसिध्दी माध्यमांनी आवाज उठविला होता. आयुक्त प्रशिक्षणासाठी शहराबाहेर असतानाच अचानक बदलीचा आदेश जारी करण्यात आला असून महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार राधाबिनोद शर्मा या आयएएस अधिकाऱ्याकडे सोपविला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475