जिल्हा

कल्याणमध्ये शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा

कल्याणमध्ये शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा
कल्याणमध्ये शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा फोटो: ठाणे वैभव
शिवसेना नगरसेवकाची भाजपा समर्थकाला मारहाण कल्याण : कल्याण पूर्वेत शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप समर्थकांमध्ये झालेल्या वादामुळे राजकीय वातावरण तापले आहे. श्रीराम टॉकीज परिसरात घडलेल्या या घटनेत भाजप समर्थकांनी शिवसेना नगरसेवक मधुर म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांकडून भाजप कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक मधुर म्हात्रे यांना मारहाण करण्यात आल्याचा, तसेच त्यांच्या भावावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खडेगोळवली परिसरात भाजपचे माजी उपमहापौर विक्रम तरे यांचे समर्थक आकाश जायसवाल आणि नगरसेवक मधुर म्हात्रे यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद वाढत जाऊन दोन्ही गट आमनेसामने आले आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. शिवसेनेच्या वतीने नगरसेवक मधुर म्हात्रे यांना मारहाण करण्यात आल्याचा तसेच त्यांच्या भावावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर भाजप समर्थकांनी नगरसेवक मधुर म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांनी भाजप कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याच्या सत्यतेची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. विशेष म्हणजे, मधुर म्हात्रे हे केडीएमसी निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मशाल चिन्हावर निवडून आले होते. त्यांनी भाजपचे उमेदवार विक्रम तरे यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश केला. कोळसेवाडी पोलिस ठाण्यात दोन्ही पक्षांच्या तक्रारींवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि अन्य पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असून, तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475