जिल्हा

सुट्टीच्या दिवशीही मालमत्ता करवसुली कार्यालये सुरू राहणार

सुट्टीच्या दिवशीही मालमत्ता करवसुली कार्यालये सुरू राहणार
सुट्टीच्या दिवशीही मालमत्ता करवसुली कार्यालये सुरू राहणार फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ठाणेकर करदात्यांना कर भरणे सोयीचे व्हावे यासाठी 31 मार्च 2026 पर्यत सुट्टीच्या दिवशीही महानगरपालिकेची सर्व प्रभाग व उपप्रभाग स्तरावरील सर्व कर संकलन केंद्रे व करवसुली कार्यालये सुरू राहणार असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जे करदाते त्यांचा मालमत्ता कर प्रत्यक्ष प्रभाग कार्यालयात येऊन भरतात अशा करदात्यांना सोयीचे व्हावे याकरिता ठाणे महानगरपालिकेची सर्व प्रभाग व उप प्रभाग स्तरावरील सर्व कर संकलन केंद्रे, प्रभाग स्तरावरील करवसुली कार्यालये तसेच महापालिका प्रशासकीय भवनातील नागरी सुविधा केंद्रामधील कर संकलन केंद्र 3 जानेवारी ते 31 मार्च या कालावधीमधील सर्व शनिवार, रविवार तसेच सर्व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी (3 मार्च, 2026 रोजी धुलीवंदन असल्याने हा दिवस वगळून) सकाळी 10.30 ते 4.30 तसेच सर्व रविवार सकाळी 10.30 ते 1.30 या वेळेत कर संकलनाकरिता करवसुली संकलन केंद्र व मुख्य कार्यालयही कार्यान्वीत ठेवण्यात येणार आहेत. सन 2025-26 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके ऑनलाईन पध्दतीने भरण्याकरिता महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ई सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच प्रभाग कार्यालयाकडील सर्व संकलन केंद्रावरही मालमत्ता कराची देयके स्विकारली जातात असेही उपआयुक्त (कर) जी.जी. गोदेपुरे यांनी नमूद केले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475