जिल्हा

शिक्षण आणि परिवहन विभागातही पदोन्नत्यांचे सत्र

शिक्षण आणि परिवहन विभागातही पदोन्नत्यांचे सत्र
शिक्षण आणि परिवहन विभागातही पदोन्नत्यांचे सत्र फोटो: ठाणे वैभव
ठाणे: काल ४६ लिपिकांना पदोन्नती दिल्यानंतर ठाणे महानगरपालिकेने ४६ वरिष्ठ लिपिकांना उप अधिक्षक आणि महानगरपालिकेच्या सेवेतील ३८ उपशिक्षकांना (प्राथमिक विभाग, मराठी माध्यम) मुख्याध्यापक पदावर पदोन्नती दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. ठाणे महानगरपालिकेच्या ३८ उपशिक्षक आणि ५३ वरिष्ठ लिपिकांची पदोन्नतीचे आदेश अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी बुधवारी काढले. त्यापूर्वी, मंगळवारी, वरिष्ठ लिपिक या पदावर ४६ जणांना, अग्निशमन प्रणेता (लिडिंग फायरमन) या पदावर १९ जणांना, तर सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी या पदावर दोन जणांना पदोन्नती देण्यात आली. आतापर्यंत एकूण १५८ जणांना पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नतीच्या या निर्णयांमुळे महापालिका कर्मचारी, शिक्षक यांच्यात आनंदाचे वातावरण असून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आभार मानले आहेत. दरम्यान परिवहन सेवेतील वाहन चालक, वाहक अशा १०९ कर्मचाऱ्यांना देखिल पदोन्नती आणि ४७ जणांना अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात आली असल्याची माहिती ठाणे परिवहनचे महाव्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी दिली. मागील अनेक वर्षे अनुकंपा तत्वावरील वारस नोकरीच्या प्रतिक्षेत होते. त्यांना नोकरी मिळाल्याने त्यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475