महाराष्ट्र

एनएमएमटीची ३४ क्रमाकांची बस बंद केल्याने प्रवाशांचे हाल

एनएमएमटीची ३४ क्रमाकांची बस बंद केल्याने प्रवाशांचे हाल
एनएमएमटीची ३४ क्रमाकांची बस बंद केल्याने प्रवाशांचे हाल फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई : ८ फेब्रुवारी रोजी खोपटा येथे एनएमएमटी बसला झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको करून आणि एनएममएमटी कर्मचाऱ्यांना डांबून ठेवले होते. त्याच्या निषेधार्ह नवी मुंबईतील जुईनगर रेल्वेस्थानक ते उरणच्या कोप्रोली/ वशेणी गाव दरम्यानची एनएमएमटीची ३४ क्रमांकाची बससेवा शुक्रवारपासून अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली. त्यामुळे नवी मुंबई शहराकडे ये-जा करणाऱ्या विद्यार्थी आणि प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. नवी मुंबई परिवहन बस क्रमांक ३४ ही बससेवा उरण तालुक्यातील कोप्रोली, वशेणी, पिरकोणसारख्या खेडेगावात धावत होती. या बस सेवेचा प्रवास स्वस्त असल्याने ग्रामीण भागातील चाकरमानी, नोकरदार वर्ग आणि विद्यार्थ्यांना त्याचा जास्त फायदा होत आहे. उरण पूर्व भागातील अनेक नागरीक या बसने प्रवास करत असत. मात्र गुरुवारी ८ फेब्रुवारी रोजी खोपटे येथे झालेल्या अपघातानंतर ही बस बंद करण्यात आली आहे. त्यामुळे येथील रिक्षाचालक आणि ईको चालकांचे फावले असून अधिक दर आकारून ग्राहकांची लुटमार सुरू असल्याची ओरड सुरू झाली आहे. पुर्वी प्रवाशांना कोप्रोलीवरून थेट नवी मुंबईच्या जूईनगर पर्यत जाता येत होते. मात्र आत्ता नवघर फाटा किंवा टाऊनशिपपर्यंत इको किंवा ऑटोपर्यंत जाण्यासाठी २०-३० रूपये खर्च होत असल्यांना प्रवाशांना भूर्दंड सहन करावा लागत आहे. या मार्गावर दिवसभर ५२ फेऱ्या आणि पाच हजारांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करीत होते. त्यामुळे या परिसरातील हजारो प्रवाशांना याचा फटका बसला आहे. गुरुवारी झालेल्या अपघातानंतर व त्यानंतर कर्मचाऱ्यांना डांबून ठेवल्याने कर्मचाऱ्यांनी जुईनगर ते कोप्रोली मार्गावर काम करण्यास दिला आहे. त्यामुळे ही बससेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी एनएमएमटीचे व्यवस्थापक योगेश कडूस्कर यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद लाभला नाही. उरण कोप्रोली येथे जाण्यासाठी आम्हाला ३४ क्रमांकाची बस सोयीची होती आणि बसभाडे देखील परवडते. शुक्रवारपासून ही बससेवा बंद असल्याने आम्हाला नवघर फाट्यावरून रिक्षा पकडून कोप्रोली गाठावे लागते. ते अधिक खर्चिक आहे. त्यामुळे एनएमएमटी प्रशासनाने यावर तोडगा काढून ही बससेवा तत्काळ सुरू करावी, अशी मागणी प्रवासी अवधूत मोरे यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475