जिल्हा

एनएमएमटीमधील कंत्राटी कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार

एनएमएमटीमधील कंत्राटी कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार
एनएमएमटीमधील कंत्राटी कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार फोटो: ठाणे वैभव
कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे पालिका प्रशासनाला निर्देश नवी मुंबई: नवी मुंबई महापालिका, परिवहनमधील कंत्राटी कामगारांची वेतनवाढ व अन्य सुविधांचा विषय लवकर मार्गी लावण्याच्या श्रमिक सेनेच्या मागणीच्या अनुषंगाने आज राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या समवेत मंत्रालयात आज बैठक पार पडली. या बैठकीमध्ये कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी नवी मुंबई महापालिका प्रशासनास काही महत्वाच्या सूचना करून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आदेश दिले. नवी मुंबई महापालिकेमध्ये सुमारे आठ हजार साफसफाई कर्मचारी ठेकेदारांमार्फत कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. तर नवी मुंबई परिवहनमध्ये १४०० आणि महापालिकेमध्ये एक हजार कर्मचारी ठोक मानधन, रोजंदारी आणि सहा महिने नियुक्ती तत्वावर कार्यरत आहेत. परंतु २०१० पासून या कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन तुटपुंजे आहे. नवी मुंबई महापालिकेमधील कंत्राटी कामगारांच्या वेतन वाढीच्या प्रश्नावर श्रमिक सेनेने राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे विनंती केली होती. त्यानुसार मंत्री गणेश नाईक यांनी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या समवेत श्रमिक सेना शिष्टमंडळाची बैठक घडवून आणली. शिष्टमंडळाच्या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी पालिका प्रशासनाने कंत्राटी कामगारांच्या वेतन वाढीसाठी नियुक्त केलेल्या श्रीवास्तव समितीचा अहवाल एका आठवड्यात सादर करण्याचे निर्देश दिले. महापालिका ही स्वायत्त संस्था असल्याने त्यांनी हा अहवाल प्राप्त होताच पुढच्या एका आठवड्यात वेतन वाढीचा निर्णय घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा, असे महापालिका प्रशासनाला आदेशित केले. नवी मुंबई महापालिकेत कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असल्याने हा निर्णय फक्त नवी मुंबई महापालिकेला लागू होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीस कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे, कामगार आयुक्त एच. पी. तुमोड, कामगार उपायुक्त प्रदीप पवार, कामगार उपायुक्त वाघ, सहाय्यक कामगार आयुक्त राऊत यांच्यासह कामगार विभागाचे उच्च अधिकारी उपस्थित होते. श्रमिक सेनेच्या वतीने सरचिटणीस चरण जाधव, सुरज पाटील, विजय साळे हे पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475