जिल्हा

नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा

नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा
नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा फोटो: ठाणे वैभव
राज्याबाहेर राहण्याचे न्यायालयाचे निर्देश कल्याण : शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना कथित मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले नगरसेवक रमेश म्हात्रे यांची आधारवाडी कारागृहातून सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जामीन देताना काही कठोर अटी घालण्याचे संकेत दिले असून, याबाबतचा सविस्तर आदेश शुक्रवारी सकाळी जारी करण्यात येणार आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार, आरोपपत्र दाखल होईपर्यंत रमेश म्हात्रे यांना महाराष्ट्राच्या हद्दीबाहेर राहावे लागणार आहे. तसेच मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी ते ज्या ठिकाणी असतील, त्या ठिकाणच्या स्थानिक पोलीस ठाण्यात हजेरी लावणे बंधनकारक राहणार आहे. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर खटला संपेपर्यंत दर बुधवारी पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत म्हात्रे यांनी कोणत्याही माध्यमातून साक्षीदार तसेच पीडित डॉक्टरांशी संपर्क साधू नये, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. याशिवाय खटला संपेपर्यंत पासपोर्ट न्यायालयात जमा ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाचा सविस्तर आदेश शुक्रवारी जारी झाल्यानंतर रमेश म्हात्रे यांच्या आधारवाडी कारागृहातून सुटकेची प्रक्रिया स्पष्ट होणार आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475