जिल्हा

परशुराम महामंडळाचे अध्यक्ष दामले यांना मंत्रिपदाचा दर्जा

परशुराम महामंडळाचे अध्यक्ष दामले यांना मंत्रिपदाचा दर्जा
परशुराम महामंडळाचे अध्यक्ष दामले यांना मंत्रिपदाचा दर्जा फोटो: ठाणे वैभव
बदलापूर: राज्याच्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. दामले यांच्या रूपाने ठाणे जिल्ह्याला नवा मंत्री मिळाला आहे. राज्य सरकारच्या नियोजन विभागाने १६ सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांना मंत्री पदाचा दर्जा आणि सोयी-सुविधा देण्यात आल्या आहेत. दामले यांच्या मंत्रिपदाच्या दर्जाने ठाणे जिल्ह्यातील मंत्र्यांची संख्या चार झाली आहे. राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची उपमुख्यमंत्री पदी वर्णी लागली. सरकार स्थापन झाल्यानंतर महामंडळांचेही समसमान वाटप करण्यात आले. त्यानुसार राज्यातील ब्राम्हण वर्गासाठी महत्वाच्या असलेले परशुराम आर्थिक विकास महामंडळ उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे गेले. त्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले होते. बदलापूरचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि आशिष दामले हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विशेषतः पवार कुटुंबियांचे निकटवर्तीय मानले जातात. आशिष दामले यांनी परशुराम आर्थिक महामंडळाच्या कामाला सुरूवात केली होती. नव्याने स्थापन झालेल्या या मंडळाला नव्याने अधिकाऱ्यांचीही मदत देण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनंतर आता या मंडळाचा कारभार सुरू आहे. राज्यभर फिरून मंडळाचे काम करत असतानाच आता राज्य सरकारने आशिष दामले यांना मंत्रीपदाचा दर्जा दिला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475