जिल्हा

टिटवाळा-वासिंददरम्यान फलाट विस्तारीकरण

टिटवाळा-वासिंददरम्यान फलाट विस्तारीकरण
टिटवाळा-वासिंददरम्यान फलाट विस्तारीकरण फोटो: ठाणे वैभव
मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने टिटवाळा-वासिंद स्थानकांदरम्यान विशेष वाहतूक आणि पाॅवर ब्लाॅक घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा ब्लॉक फलाट विस्तार कामांसाठी घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक शुक्रवारी मध्यरात्री असेल. या ब्लाॅकमुळे रेल्वेगाड्या आणि रात्री उशिरा धावणाऱ्या लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होईल. प्रवाशांची संख्या वाढत असल्याने प्रवाशांना लोकलमधील गर्दीतून प्रवास करावा लागतो. गेल्या अनेक वर्षांपासून १५ डबा लोकल चालवण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. परंतु, पायाभूत कारणांमुळे १५ डबा लोकल चालवणे शक्य होत नव्हते. परंतु, मध्य रेल्वे प्रशासनाने फलाटांच्या विस्तारीकरणाची कामे हाती घेतली आहेत. मध्य रेल्वेद्वारे ३४ फलाटांचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. मागील काही दिवसांत ठाणे आणि डोंबिवली येथील फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम मध्य रेल्वे प्रशासनाने हाती घेतले होते. टिटवाळा-वासिंद अप आणि डाऊन रेल्वे मार्गावर शुक्रवारी मध्यरात्री २.१० ते ३.२५ दरम्यान ब्लाॅक घेण्यात येणार आहे. या ब्लाॅक कालावधीत काही रेल्वेगाड्या टिटवाळा-कसारादरम्यान थांबवण्यात येतील. गाडी क्रमांक १२१०२ शालीमार-लोकमान्य टिळक टर्मिनस ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस वाशिंद येथे थांबवण्यात येईल. गाडी क्रमांक १८०३० शालीमार-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस आसनगाव येथे थांबविण्यात येईल. गाडी क्रमांक १२८१० हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस आटगाव येथे थांबविण्यात येईल. गाडी क्रमांक २०१०४ भटनी-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस खर्डी येथे थांबविण्यात येईल. तसेच, गाडी क्रमांक ०१०२६ बलिया-दादर एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक ०११३९ नागपूर-मडगाव विशेष एक्स्प्रेस या रेल्वेगाड्या भुसावळ विभागात आवश्यकतेनुसार नियंत्रित करण्यात येतील. उशिरा धावणाऱ्या मेल/एक्सप्रेस व प्रवासी रेल्वेगाड्यांबाबत त्या दिवशीच घोषणा करण्यात येईल आणि त्या रेल्वे गाड्याही कार्यानुसार थांबवण्यात किंवा अंशत: रद्द करण्यात येतील. ब्लाॅक कालावधीत १५ डबा लोकल उभे राहण्यासाठी फलाटांची लांबी वाढविण्याचे काम सुरू आहे. यासाठी अतिक्रमण हटविण्यात येणार आहेत. तसेच टिटवाळा आणि खडवली स्थानकांवरील नवीन पाॅइंट्सवर ओव्हर हेड वायर कार्यान्वित करण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.  

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475