जिल्हा

एक लाखाहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले मराठीचे धडे

एक लाखाहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले मराठीचे धडे
एक लाखाहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले मराठीचे धडे फोटो: ठाणे वैभव
१५ ऑगस्टपर्यंत उर्वरित चालकांना सुवर्णसंधी मुंबई : मराठी ही सक्तीची नव्हे, तर आपुलकीची भाषा आहे. प्रवाशांशी दोन प्रेमाचे शब्द मराठीत बोलणारा प्रत्येक चालक हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान करणारा दूत ठरतो, अशा भावनिक शब्दांत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाला' मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. या अभियानाअंतर्गत राज्यभरातील एक लाखाहून अधिक अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांनी व्यवहारिक मराठीचे धडे यशस्वीरित्या पूर्ण केले असून, उर्वरित चालकांनीही १५ ऑगस्टपूर्वी या संधीचा लाभ घेऊन मराठी शिकावे, असे आवाहन सरनाईक यांनी केले. या अभियानाच्या आढावा बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप ढवण, मुंबई मराठी साहित्य संघ तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेचे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संयुक्त सहकार्याने हे अभियान राज्यभर लोकचळवळीचे स्वरूप धारण करत असल्याचे सरनाईक यांनी नमूद केले. १ मेपासून सुरू झालेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाचा समारोप १७ ऑगस्ट रोजी ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार तसेच मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात हजारो अमराठी चालकांना कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने व्यवहारिक मराठी प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475