जिल्हा

ठाणे पुर्वेत चिकन-मटणाची दुकाने बंद करण्याचे आदेश

ठाणे पुर्वेत चिकन-मटणाची दुकाने बंद करण्याचे आदेश
ठाणे पुर्वेत चिकन-मटणाची दुकाने बंद करण्याचे आदेश फोटो: ठाणे वैभव
बर्ड फ्लूचा शिरकावामुळे सावधगिरी ठाणे : कोपरी परिसरात देशी प्रजातीतील कोंबडी आणि टर्की कोंबडी यांचा १४ जानेवारीला मृत्यू झाला होता. कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा अहवाल राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून ठाणे महापालिकेला प्राप्त झाला आहे. त्यामुळे कोपरीमधील चिकन आणि मटणाची दुकाने पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश पालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या शासकिय निवासस्थानात पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याने खळबळ उडाली होती. या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने पावले उचलली आहेत. दरम्यान, बर्ड फ्ल्यू आजाराने कोपरी परिसरातही शिरकाव केल्याने मांसाहार खाणाऱ्या खवय्यांची अडचण झाली आहे. ठाणे पूर्व येथील कोपरी परिसरात देशी प्रजातीतील कोंबडी आणि टर्की कोंबडी यांचा १४ जानेवारीला मृत्यू झाला होता. कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा अहवाल राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून ठाणे महापालिकेला प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासन धावपळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर कोपरी परिसरात सुरक्षेचा उपाय म्हणून कोंबडी आणि मटण विक्रीला बंदी करण्यात आली आहे. शहरात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे पत्र ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिकेला पाठवले आहे. बर्ड फ्ल्यू रोगाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यानुसार यावर उपाय योजना आखण्यात आल्या आहेत. यात कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विलगीकरण कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. तसेच पुरेसा औषधसाठा, डॉक्टरांसह इतर पथक देखील सज्ज झाली आहे. रुग्णालयात एकूण १९ बेड सज्ज ठेवण्यात आले आहेत. त्यातील १५ साधे तर चार आयसीयूचे बेड आहेत. तसेच डॉक्टर आणि परिचारिका यांचे पथकही तयार ठेवण्यात आले आहे. पशुसंवर्धन विभागाच्या उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एव्हियन इन्फ्ल्यूएंजा कंट्रोल मार्गदर्शन तत्वे जाहिर करण्यात आली आहेत. पॉझिटिव्ह सापडलेल्या पक्षांच्या ठिकाणापासून एक किलोमीटर क्षेत्रात सर्वच चिकन व अंडी विक्री दुकाने जिल्हाधिकारी व दंडाधिकारी यांच्या आदेशान्वये बंद करण्यात आलेली आहेत. मांस विक्रेते करणाऱ्यांना स्वच्छता बाळगण्याबाबत आदेश देण्यात आले आहे. पशुसंवर्धन विभाग तसेच ठाणे महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभाग, कोंडवाडा विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागमधील कर्मचाऱ्यांचे भरारी पथक तयार करण्यात आले आहेत. हे पथक जिल्ह्यात अनेक ठिकाणी सर्वेक्षण करणार असून बाधित क्षेत्रात बाधित मांस दुकानांमध्ये कोंबड्या विक्रीसाठी येणार नाहीत यावर बारकाईने नजर ठेवणार आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475