जिल्हा

वसतिगृहामध्ये निवासी डॉक्टरच होणार रुग्ण

वसतिगृहामध्ये निवासी डॉक्टरच होणार रुग्ण
वसतिगृहामध्ये निवासी डॉक्टरच होणार रुग्ण फोटो: ठाणे वैभव
आमदार संजय केळकर यांनी आरोग्य प्रशासनाला धरले धारेवर ठाणे: कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील निवासी डॉक्टर आणि विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात अस्वच्छता आणि असुविधांमुळे डॉक्टरच रुग्ण होण्याची चिन्हे असून आज आमदार संजय केळकर यांनी भेट देऊन तेथील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी दोन आठवड्यात समस्या दूर करून सुविधा देण्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले. निवासी डॉक्टर आणि वैद्यकीय कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार आमदार संजय केळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील वसतिगृहाची पाहणी केली. वसतिगृहात सर्वत्र अस्वच्छता, अस्वच्छ पिण्याचे पाणी, दुर्गंधी असल्याने निवासी डॉक्टर आजारी पडण्याच्या मार्गावर आहेत.तसेच झोपण्यासाठी देखील पुरेसे बेड नाहीत. याबाबत निवासी डॉक्टरांनी निवेदने देऊनही समस्या दूर झाल्या नसल्याच्या तक्रारी निवासी डॉक्टरांनी केल्या. याबाबत श्री.केळकर यांनी डीन स्वप्नाली कदम यांची भेट घेऊन चर्चा केली. यावर दोन आठवड्यात वसतिगृहाला आवश्यक सुविधा देण्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले. यावेळी डॉ.योगेश शर्मा, डॉ.अथर्व शिंदे, किशोर सोनगडा तसेच कृष्णा भुजबळ, विशाल वाघ आदी उपस्थित होते. याबाबत श्री.केळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, येथील कंत्राटदार महापालिकेचे जावई असल्याप्रमाणे वागत आहेत. येथे होणाऱ्या भ्रष्टाचाराबाबत महापालिका कोणतीही कारवाई करत नाही. केवळ सीसीटीव्ही कॅमेरे लावून सुरक्षा आणि सुविधांचा प्रश्न सुटणार नसून एखादी घटना घडण्याआधीच लक्ष देण्याची गरज श्री.केळकर यांनी व्यक्त करत आयुक्तांनी तत्काळ या समस्यांची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475