जिल्हा

ठाण्यात कोरोनामुळे एकाचा मृत्यू

ठाण्यात कोरोनामुळे एकाचा मृत्यू
ठाण्यात कोरोनामुळे एकाचा मृत्यू फोटो: ठाणे वैभव
ठाणे: जिल्ह्यात आज ११२ नवीन कोरोना रूग्ण सापडले असून ठाणे शहरात एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, त्यामुळे ठाणेकरांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील नवी मुंबई महापालिका हद्दीत सर्वाधिक ४४ नवीन रुग्णांची भर पडली. ठाणे महापालिका हद्दीत ४० रूग्ण वाढले आहेत. कल्याण-डोंबिवली आणि ठाणे ग्रामिण परिसरात प्रत्येकी सहा रुग्णांची नोंद झाली आहे. आठ रूग्ण मीरा-भाईंदर येथे मिळाले आहेत. उल्हासनगरमध्ये पाच तर भिवंडी आणि बदलापूर भागात प्रत्येकी एक रूग्ण नोंदवला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील सात लाख ५०,४७७ रूग्ण बाधित सापडले आहेत तर रुग्णालयात आणि घरी ९५५जणांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत सात लाख ३८,३१२ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत ११,९८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475