जिल्हा

८४३ कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कापला

८४३ कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कापला
८४३ कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कापला फोटो: ठाणे वैभव
भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिकेच्या विविध विभागामध्ये 29 ऑगस्ट 2025 रोजी अधिकारी/कर्मचारी विनापरवानगी गैरहजर राहिल्याचे अतिरिक्त आयुक्तांच्या निदर्शनास आल्याने गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांसह कंत्राटी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. शहरातील दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनानंतर महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारी मिळून सुमारे 843 कर्मचारी 29 ऑगस्ट 2025 रोजी गैरहजर राहिले होते. याबाबत अतिरिक्त आयुक्त डॉक्टर संभाजी पानपट्टे यांनी माहिती मागवून घेतली ल. त्यावेळी वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी स्थायी अधिकारी व कर्मचारी मिळून सुमारे 650 व कंत्राटी कर्मचारी मिळून एकूण 843 कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश जारी केले. गणपती विसर्जनानंतर रात्री उशिरापर्यंत काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर राहावे लागत असल्याने विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी गैरहजर राहण्याचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. याबाबत प्रशासक पालिका प्रशासनाने यावर्षी ठोस भूमिका घेत वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान केल्याचा ठपका ठेवत गैरहजर राहिलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कापण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पालिकेची सुमारे १४ लाखांची बचत होणार आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475