जिल्हा
सुट्टीच्या दिवशीही जात पडताळणी समित्यांची कार्यालये सुरू
सुट्टीच्या दिवशीही जात पडताळणी समित्यांची कार्यालये सुरू
फोटो: ठाणे वैभव
मुंबई: निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कामकाज सुरळीत पार पडावे यासाठी तसेच राखीव जागांसाठी निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांकडून जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी उमेदवारांची कोणतीही गैरसोय होऊ नये, म्हणून सुट्टीच्या दिवशीही जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांची कार्यालये सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांनी २२ डिसेंबर २०२५ रोजी प्रथम प्राधान्य परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार महानगरपालिका निवडणूक कार्यक्रमात नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३० डिसेंबर २०२५ आहे. त्यामुळे अर्जदारांना वेळेत सेवा मिळावी यासाठी सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांनी २५, २७ आणि २८ डिसेंबर २०२५ या सुट्टीच्या दिवशीही कार्यालये सुरू ठेवावीत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
हे आदेश सुनील वारे, महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे तसेच मुख्य समन्वयक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या (सर्व), महाराष्ट्र राज्य यांनी जारी केले आहेत. या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रियेत अडथळे येणार नाहीत तसेच उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक सेवा वेळेत मिळण्यास मदत होणार आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475