जिल्हा

नो-पार्किंग आणि प्रवेशबंदी; ठाणे पूर्वेची सुटणार कोंडी

नो-पार्किंग आणि प्रवेशबंदी; ठाणे पूर्वेची सुटणार कोंडी
नो-पार्किंग आणि प्रवेशबंदी; ठाणे पूर्वेची सुटणार कोंडी फोटो: ठाणे वैभव
वाहतूक शाखेची कायमस्वरूपी उपाययोजना ठाणे: ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागात रोज होणाऱ्या वाहतुक कोंडीने रेल्वे प्रवासी आणि स्थानिक नागरिक हैराण झाले असून ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ठाणे वाहतुक पोलिसांनी कायमस्वरूपी प्रवेशबंदी आणि नो पार्किंग धोरण लागू केले आहे. ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला सॅटीस पूल निर्माणाची कामे सुरु आहेत. या कामांमुळे येथील मार्गिका अरुंद झाली आहे. रेल्वे स्थानक परिसरात दुचाकी देखील उभ्या केल्या जातात. त्यामुळे कोंडीत भर पडते. येथील वाहतुक कोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतुक पोलिसांनी काही मार्गांवर वाहने उभी करण्यास वेळेचे बंधन लागू केले आहे. तर काही ठिकाणी प्रवेशबंदी लागू केली आहे. पंजाब नॅशनल बँक ते महापालिकेचे अग्निशमन दल केंद्र मार्गाच्या डाव्या बाजूस १०० मीटर अंतरापर्यंत सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आणि दुपारी ३ ते रात्री १२ वाजेपर्यंत उजव्या बाजूस परवानगी असेल. अग्निशमनदल केंद्र राधाकृष्ण मंदिर मार्गाच्या डाव्या बाजूस ५० मीटर अंतरापर्यंत सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आणि उजव्या बाजूस दुपारी ३ ते रात्री १२ वाजेपर्यंत वाहने उभी करण्यास मूभा असेल. सिद्धार्थनगर, भीमशक्ती चौक येथून दिपक लस्सी सेंटर मार्गाने प्रवेश करणाऱ्या वाहनांना (दुचाकी वगळून) भीमशक्ती चौक येथे प्रवेशबंदी असेल. तसेच दिपक लस्सी सेंटर दुकानाजवळून हसिजा काॅर्नरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना दिपक लस्सी सेंटर येथे प्रवेशबंदी असेल. या बदलामुळे या भागातील वाहतूक कोंडीची गंभीर समस्या बऱ्याच अंशी सुटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475