महाराष्ट्र

शाळेच्या नऊ महिला कर्मचारी लिफ्टमध्ये अडकल्या

शाळेच्या नऊ महिला कर्मचारी लिफ्टमध्ये अडकल्या
शाळेच्या नऊ महिला कर्मचारी लिफ्टमध्ये अडकल्या फोटो: ठाणे वैभव
ठाणे : येथील प्रसिद्ध असलेल्या वसंत विहार या शाळेच्या नऊ महिला ११ व्या मजल्यावरील कर्मचारी लिफ्टमध्ये सायंकाळी १५ मिनिटे अडकल्यामुळे शाळेचे पदाधिकारी आणि कर्मचा-यांना प्रचंड धावपळ करण्याची वेळ आली. सुदैवाने, घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान एक फायर वाहनासह तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी एक पिकअप वाहनासह उपस्थित होते. परिणामी, घटनास्थळी कोणालाही दुखापत झालेली नाही. बाळकुम येथील जास्मिन टॉवर या तळ अधिक १८ मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर लिफ्टमध्ये नऊ महिला ११ व्या मजल्यावर जात असताना लिफ्टमध्ये अडकल्या होत्या. पुष्पा हासे (५७), रुपाली मराठे (५०), लीना नंबियार (५४), दीपिका रुपवने (४१), पूनम सिंग (३७), सुमन गायकवाड (३४), सीमा ढाकणे (४४), श्रीकला नायर (५३) आणि उमा सोनी (४०) अशी या सुटका झालेल्या महिलांची नावे आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान ०१- फायर वाहनांसह तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०१- पिकअप वाहनासह उपस्थित होते. सुदैवाने, घटनास्थळी कोणालाही दुखापत झाली नाही. लिफ्टमध्ये अडकलेल्या व्यक्तींची सुखरूप सुटका झाली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475