जिल्हा

निलेश सांबरे शिंदे गटात दाखल

निलेश सांबरे शिंदे गटात दाखल
निलेश सांबरे शिंदे गटात दाखल फोटो: ठाणे वैभव
ठाणे : जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी नुकताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात अधिकृतरित्या प्रवेश केला. ठाणे येथील किआरा बँक्वेट हॉलमध्ये पार पडलेल्या या ऐतिहासिक सोहळ्यात उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव राम रेपाळे, संजय मोरे, एकनाथ भोईर, माजी आमदार रवींद्र फाटक तसेच जिजाऊ संघटनेचे कोकण विभागातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था’ व ‘जिजाऊ संघटने च्या माध्यमातून त्यांनी आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, रोजगार आणि ग्रामीण विकास या सर्वच क्षेत्रांत मोठे काम केले आहे. त्यांच्या प्रयत्नातून तीन मोफत मल्टीस्पेशालिटी रुग्णालय, दहा इंग्रजी माध्यमाच्या मोफत शाळा, पंचवीस मोफत रुग्णवाहिका सेवा, २८ मोफत आरोग्य केंद्र आणि दोन हजारांहून अधिक गावांत शाखा कार्यरत आहेत. या माध्यमातून त्यांनी लाखो लोकांपर्यंत सेवा पोहोचवली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रवेशाचे मन:पूर्वक स्वागत करताना नमूद केलं की, निलेश सांबरे यांचे कार्य मी अनेक वर्षांपासून पाहत आहे. निलेश जिजाऊचा ढाण्या वाघ आहे. ते ज्या पातळीवर समाजात कार्यरत आहेत, त्यांना समाजकार्यातील हिरा म्हंटलं तर ते चुकीच ठरणार नाही. अशा नेतृत्वाचा पक्षात प्रवेश होणं, ही संपूर्ण शिवसेनेसाठी अभिमानाची बाब आहे. हा केवळ एक प्रवेश नाही, तर समाजकारणाला राजकीय दिशा देणारा ऐतिहासिक क्षण आहे. या प्रवेशामुळे कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेला एक नवा उर्जास्रोत लाभला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475