जिल्हा
येत्या रविवारचे खग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार
येत्या रविवारचे खग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: येत्या रविवारी ७ सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री होणारे खग्रास चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार असल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले.
रविवार ७ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजून ५७ मिनिटांनी चंद्रग्रहणास प्रारंभ होईल. रात्री ११ ते १२.२३ दरम्यान संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने खग्रास स्थितीचे दर्शन होईल. खग्रास स्थितीमध्ये पौर्णिमेचे संपूर्ण चंद्रबिंब लालसर, तपकिरी रंगाचे दिसेल. रात्री १२.२३ वाजता चंद्रग्रहण सुटण्यास प्रारंभ होईल. उत्तररात्री १ वाजून २७ मिनिटांनी चंद्रग्रहण पूर्णपणे सुटेल. हे खग्रास चंद्रग्रहण सर्वांना साध्या डोळ्यांनी पाहता येईल.
हे खग्रास चंद्रग्रहण भारताप्रमाणेच संपूर्ण आशिया, आफ्रिका, यूरोप, आस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथूनही दिसेल. यापुढील चंद्रग्रहण मंगळवार ३ मार्च २०२६ रोजी होईल,असेही दा.कृ.सोमण यांनी सांगितले.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475