महाराष्ट्र

सार्वजनिक शौचालयात सापडले नवजात बाळ

सार्वजनिक शौचालयात सापडले नवजात बाळ
सार्वजनिक शौचालयात सापडले नवजात बाळ फोटो: ठाणे वैभव
बाळाला उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात केले दाखल उल्हासनगर: उल्हासनगर शहरात एक हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. चक्क महिला सार्वजनिक शौचालयात एक दिवसाचे नवजात बाळ सापडले आहे. बाळाला परिसरातील नागरिकांनी शौचालयातून बाहेर काढून उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले आहे. उल्हासनगर कॅम्प नंबर ४ सुभाष टेकडी परिसरातील आम्रपालीनगर येथील सार्वजनिक शौचालयात आज सकाळच्या सुमारास एका महिलेस बाळ असल्याचे दिसले. याबाबत तिने परिसरातील नागरिकांना माहिती दिली. नागरिकांनी बाळाला शौचालयातून बाहेर काढून उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची माहिती मिळताच मध्यवर्ती शासकीय रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मनोहर बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग तज्ञ डॉ. वसंतराव मोरे यांनी तत्काळ नवजात बाळावर उपचार सुरु केले. रुग्णालयात दाखल करण्यात आलेले बाळ हे स्त्री जातीचे असून त्याचे वजन 2 किलो 130 ग्रॅम आहे. बाळ रुग्णालयात आणले तेव्हा बाळाची नाळ बांधलेली नव्हती, तसेच त्याचे शरीर पूर्णतः थंड पडले होते. मात्र तत्काळ उपचार सुरु केल्याने आता बाळाची प्रकृती ठीक असल्याची माहिती डॉ. वसंत मोरे यांनी दिली. या घटनेची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून आरोपीचा शोध सुरु केला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475