महाराष्ट्र

नवीन वीजजोडणी तत्काळ उपलब्ध होणार

नवीन वीजजोडणी तत्काळ उपलब्ध होणार
नवीन वीजजोडणी तत्काळ उपलब्ध होणार फोटो: ठाणे वैभव
पायाभूत वीजयंत्रणा उभारण्याचा खर्च ‘महावितरण’चा ठाणे : कृषिपंप वगळून उर्वरित सर्व वर्गवारीतील ग्राहकांना तत्काळ नवीन वीजजोडणी किंवा वीजभार वाढवून देण्यासाठी आवश्यक पायाभूत वीजयंत्रणा उभारण्याचे काम ‘महावितरण’कडून होत आहे. त्यामुळे वीजग्राहकांना तत्काळ नवीन वीजजोडणी उपलब्ध होणार आहे. नवीन वीजजोडणीसाठी नवीन सेवा योजनेचा पर्याय ग्राहकांना सर्वप्रथम देण्यात यावा तसेच कृती मानकांप्रमाणे निश्चित केलेल्या कालावधीत सेवा देण्यात यावी असे सक्त निर्देश महावितरणकडून क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहे. कृषिपंप वगळून नवीन वीजजोडण्या देण्यासाठी नवीन सेवा जोडणी (एनएससी) योजनेचा पर्याय ग्राहक योगदान व परतावा तसेच समर्पित वितरण सुविधा अशा तीन योजना अस्तित्वात आहेत. यामध्ये वीजग्राहकांना नवीन वीज जोडणी देण्यासाठी नवीन सेवा जोडणी योजना अतिशय महत्वाची आहे. या अंतर्गत नवीन वीज जोडणी देणे किंवा वीज भार कमी अधिक करण्यासाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर आवश्यक पायाभूत सुविधांची व यंत्रणेची कामे ‘महावितरण’कडून करण्यात येतील. यासाठी ग्राहकांना कोणताही खर्च करावा लागणार नाही, शिवाय केवळ सेवा जोडणी शुल्क व सुरक्षा ठेव रक्कम भरावी लागेल, अशी माहिती ‘महावितरण’च्या ठाणे पश्चिम कार्यालयातील वरिष्ठ अधिका-यांनी दिली. राज्यात काही ठिकाणी नवीन सेवा जोडणीच्या पर्यायांची माहिती ग्राहकांना देण्यात येत नसल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्याची महावितरणने गंभीर दखल घेत नुकतेच एक परिपत्रक जारी केले आहे. त्यामध्ये नवीन वीज जोडणीसाठी नव्या योजनेचा ग्राहकांना सर्वप्रथम पर्याय देण्यात यावा, असे सक्त निर्देश देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475