जिल्हा

जिल्ह्यातील १३ बालकांना नवीन कुटुंब आणि पालकत्व

जिल्ह्यातील १३ बालकांना नवीन कुटुंब आणि पालकत्व
जिल्ह्यातील १३ बालकांना नवीन कुटुंब आणि पालकत्व फोटो: ठाणे वैभव

सेवा संकल्प अभियान 

ठाणे: सेवा संकल्प अभियानांतर्गत आज ठाणे जिल्ह्यातील 13 बालकांना अधिकृत दत्तक प्रक्रियेद्वारे नवीन कुटुंब आणि पालकांना पालकत्व बहाल करण्यात आले. ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमामुळे या बालकांना सुरक्षित, प्रेमळ आणि कौटुंबिक वातावरण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अधिकृत 'कारा' (CARA) 'मिशन वात्सल्य' पोर्टलवर नोंदणी करून तब्बल चार वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर हे पालकत्व प्राप्त झाले आहे. याप्रसंगी पश्चिम बंगाल, गोवा, कर्नाटक, तेलंगणा, सिंगापूर तसेच महाराष्ट्रातील नागपूर, गोंदिया, रायगड आणि ठाणे आदी विविध भागांतील दत्तक पालक उपस्थित होते.

या संपूर्ण प्रक्रियेत देशांतर्गत 12 आणि एक आंतरराष्ट्रीय अशी एकूण 13 प्रकरणे यशस्वीपणे निकाली काढण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी उपस्थित सर्व दत्तक पालकांशी संवाद साधून बालकांच्या संगोपनासाठी शुभेच्छा दिल्या. बालकांना प्रेम, सुरक्षितता, उत्तम शिक्षण,आरोग्य आणि उज्ज्वल भविष्य मिळवून देण्यासाठी पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

आज आपल्या कुटुंबाला खऱ्या अर्थाने पूर्णत्व लाभल्याची भावनिक प्रतिक्रिया यावेळी उपस्थित पालकांनी व्यक्त केली. प्रत्येक बालकाला कौटुंबिक आधार व सुरक्षित भविष्य मिळणे ही समाजाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आणि सकारात्मक बाब असून, अधिकृत दत्तक प्रक्रिये साठी जिल्हा प्रशासनामर्फे अशा उपक्रमांना निरंतर प्राधान्य दिले जात आहे. या कार्यक्रमास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नमिता शिंदे, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन आणि विशेष दत्तक संस्थांचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475