जिल्हा

ठाण्यात अजित पवार गटाकडून नवीन चेहरे

ठाण्यात अजित पवार गटाकडून नवीन चेहरे
ठाण्यात अजित पवार गटाकडून नवीन चेहरे फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ठाण्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने पक्षाची नव्याने बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. शहराध्यक्ष नजीब मुल्ला यांनी नव्या शहर कार्यकारिणीची घोषणा करताना अनेक जुन्या चेहऱ्यांना डच्चू देत नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. नव्या कार्यकारिणीत विविध भागांतील कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. युवक, महिला आणि विविध सामाजिक घटकांमधील कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या देत संघटनेत व्यापक सहभाग वाढविण्यावर भर देण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळे पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नवीन नियुक्त्यांनुसार जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी नजीब मुल्ला सांभाळणार असून प्रदेश सरचिटणीस पदी सुहास देसाई, प्रदेश सचिवपदी हेमंत वाणी, रमेश इंदिसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिला अध्यक्षपदी वनिता गोतपागर तर युवक अध्यक्षपदी नित्यानन्द वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नजीब मुल्ला यांनी कार्यकर्त्यांना जनसंपर्क वाढविणे, नागरिकांच्या प्रश्नांवर सक्रिय राहणे आणि पक्षाचे धोरण तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले आहे. आगामी काळात प्रभागनिहाय बैठका, सदस्य नोंदणी मोहीम आणि विविध संघटनात्मक उपक्रम राबविले जाणार असल्याचेही पक्षाच्या वर्तुळातून सांगण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475