जिल्हा

प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा आज धडक मोर्चा

प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा आज धडक मोर्चा
प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा आज धडक मोर्चा फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई : नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्त, माथाडी कामगार, अल्प उत्पन्न गटातील नागरिक आणि झोपडपट्टीवासीयांना वाढीव बांधकामाप्रकरणी सिडको व नवी मुंबई महापालिकेने बजावलेल्या नोटिसांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने (शरदचंद्र पवार गट) गुरुवारी (ता. ३१) सिडको व महापालिकेच्या मुख्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. नवी मुंबई शहर वसल्यापासून येथील भूमिपुत्र तसेच स्थानिक नागरिकांच्या समस्या सुटल्या नसून अनेक मागण्या बाकी आहेत. यात गृहनिर्माण व जमिनीचे नियमन, स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे आणि त्याखालील जमिनींचे कायदेशीर नियमन सिडको व महापालिकेने त्वरित करावे. नवी मुंबई महापालिका, सिडको आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पांमध्ये स्थानिक बारवी प्रकल्पग्रस्तांना स्थायी नोकऱ्या मिळाव्यात. सिडकोकडे राखून ठेवलेले ३.७५ टक्के सामाजिक सुविधा भूखंड प्रत्यक्ष प्रकल्पग्रस्तांच्या सामाजिक उपयोगासाठी वाटप करावेत. नवी मुंबईतील विकसकांना विक्री केलेले समाजोपयोगी भूखंड नागरिकांच्या हितासाठी महापालिकेला हस्तांतरित करावेत, आदी मागण्यांचा समावेश आहे.त्यामुळे या विविध मागण्या पूर्ण कराव्या म्हणून सिडको आणि नवी मुंबई महापालिका मुख्यालयावर राष्ट्रवादीचा मोर्चा धडकणार आहे. आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रामदास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सदर मोर्चा करावे गाव येथील गणपत शेठ तांडेल मैदानापासून कूच करणार आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475