महाराष्ट्र

अशोकवन सोशल अँड कल्चरल असोसिएशन यांच्या वतीने नवरात्र उत्सवाचे आयोजन

अशोकवन सोशल अँड कल्चरल असोसिएशन यांच्या वतीने नवरात्र उत्सवाचे आयोजन
अशोकवन सोशल अँड कल्चरल असोसिएशन यांच्या वतीने नवरात्र उत्सवाचे आयोजन फोटो: ठाणे वैभव
मुंबई : नवरात्र उत्सव म्हंटल की रास गरबा, दांडिया , कलाकारांची रेलचेल यासोबतच गोंधळ, वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक संदेश देणारे उपक्रम यामुळे प्रत्येक कानाकोपऱ्यात नऊ दिवस देवीचा वेगवेगळ्या प्रकारे जागर केला जातो. अशोकवन सोशल अँड कल्चरल असोसिएशन यांच्या वतीने मुंबई उपनगरातील सर्वात मोठ्या अशोकवन कॉम्प्लेक्समध्ये वर्षभर विविध सण , उत्सव साजरे होत असतात. दरवर्षी येथे विविध कलाकारांची उपस्थिती देखील असते.१००% हिंदू कुटुंबियांनी वसलेले, १२०० हून अधिक सदनिका, ६५ रो हाऊसेस ने वसलेली कॉलनी यंदा सांस्कृतिक परंपरेचे ३५ वे वर्ष साजरे करत आहे. नवरात्री उत्सवात नऊ दिवस विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. मुलांसाठी मोफत पुस्तकांचे वितरण, महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, पैठणीचा खेळ तसेच पारंपारिक गोंधळ , बक्षीस समारंभ असे कार्यक्रम यंदा आयोजित करण्यात आले आहेत. याच सोबत यंदाच्या वर्षी कुशल बद्रिके, तेजस्विनी लोणारी या कलाकार पाहुण्यांची उत्सवाला उपस्थिती असणार आहे.हा संपूर्ण उत्सव यशस्वी होण्यासाठी दिलीप सावंत, कल्पेश लोके, मनीष प्रभू, प्रद्युम्न सावंत आदी आयोजक काम करतायत तरी अधिकाधिक भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलं आहे

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475