जिल्हा

नवी मुंबई परिवहन सेवेची 'तेजस्विनी' पुन्हा धावली

नवी मुंबई परिवहन सेवेची 'तेजस्विनी' पुन्हा धावली
नवी मुंबई परिवहन सेवेची 'तेजस्विनी' पुन्हा धावली फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई: मागील काही महिन्यांपासून बंद असलेली तेजस्विनी महिला स्पेशल बस अखेर लाडक्या बहिणीसाठी शहरातील तीन मार्गांवर पुन्हा सुरु झाली आहे. एकूण १० विशेष तेजस्विनी महिला बस परिवहन विभागाच्या ताफ्यात दाखल करण्यात आल्या होत्या. परंतु अल्पावधीतच या बसेस बंद झाल्या होत्या. त्यानंतर मागील ८ मार्च २०२५ रोजीच्या महिला दिनाचे औचित्य साधून बहिणींना भेट म्हणून तरी महिलांसाठी स्पेशल असलेल्या तेजस्विनी बसेस सुरू व्हाव्यात यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून परिवहन प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. मात्र त्यानंतर ही बससेवा सुरु करण्यात आलेली नव्हती. विशेष म्हणजे या बसेस फक्त महिलांसाठी असून आणि त्यांना सुरक्षित प्रवास मिळावा यासाठी त्या सुरू केल्या आहेत. या बसेस सकाळी आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत चालवल्या जात असून ज्यामुळे महिलांना कामावर किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी सोयीचे होत आहे. पनवेलमधील लाडक्या बहिणीसाठी देखील ही बस सुरु झाली आहे. गेल्या महिनापासून तेजस्विनी बस सुरु करण्यात आल्या असून सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत त्यानंतर सायंकाळी ४ ते ८ वाजेपर्यंत फक्त महिलासाठी ही बस सुरु केली आहे. घणसोली घरोदा ते वाशी स्टेशन ९ नंबर, ५०- घणसोली घरोदा ते पनवेल २३- आर्टिस्ट व्हिलेज ते खरकोपर या मार्गावर या बस धावणार आहेत. गेल्या महिन्यापासून तेजस्विनी बस सुरु झाली असून ही बस पनवेलपर्यंत धावणार आहे, अशी माहिती योगेश कडूस्कर, व्यवस्थापक, एनएमएमटी परिवहन सेवा यांनी दिली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475