जिल्हा

क वर्ग महानगरपालिकांमध्ये नवी मुंबई राज्यात नंबर वन

क वर्ग महानगरपालिकांमध्ये  नवी मुंबई राज्यात नंबर वन
क वर्ग महानगरपालिकांमध्ये नवी मुंबई राज्यात नंबर वन फोटो: ठाणे वैभव
शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा नवी मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा 2022’ मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ‘क’ वर्ग महापालिकांच्या गटात नवी मुंबई महानगरपालिकेस राज्यात प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबईतील एनसीपीए सभागृहात नगरविकास दिनाचे औचित्य साधून आयोजित विशेष समारंभात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी हा राज्यस्तरीय मानाचा पुरस्कार स्विकारला. याप्रसंगी व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष ना.ॲड.राहुल नार्वेकर, शिक्षणमंत्री दिपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव नगरविकास (2) सोनिया सेठी, अप्पर मुख्य सचिव नगरविकास (1) भुषण गगराणी, बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल आदी उपस्थित होते. पुरस्कार स्विकारताना आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे उपस्थित होते. नवी मुंबई महानगरपालिकेस क वर्ग महानगरपालिकांमध्ये राज्यात प्रथम क्रमांकाचे प्रशस्तीपत्र आणि रु.15 कोटी पारितोषिक रक्कमेचा धनादेश प्रदान करण्यात आला. राज्य शासनामार्फत शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेत नवी मुंबई महानगरपालिकेस मिळालेला हा राज्यात प्रथम क्रमांकाचा बहुमान प्रत्येक कामात उत्साहाने सहभागी होणा-या नवी मुंबईकर नागरिकांच्या सक्रीय सहकार्यामुळे मिळाला असून हा पुरस्कार नवी मुंबईकर नागरिकांना समर्पीत करीत असल्याचे मत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केले. स्वच्छ सर्वेक्षणामध्ये नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच राज्यात अग्रभागी राहिली असून ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ मध्ये ‘राज्यात प्रथम’ व ‘’देशात तृतीय’ क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान नवी मुंबई महानगरपालिकेने प्राप्त केलेला आहे. त्याचप्रमाणे कचरामुक्त शहरांच्या कॅटॅगरीमध्ये नवी मुंबईने ‘फाईव्ह स्टार रॅंकींग’ प्राप्त केलेले असून ओडीएफ कॅटॅगरीमध्ये सर्वोच्च ‘वॉटरप्लस’ मानांकन नवी मुंबईने प्राप्त केलेले आहे. विशेष म्हणजे ही मानांकने प्राप्त करणारे नवी मुंबई हे राज्यातील एकमेव शहर आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475