महाराष्ट्र

नरेश म्हस्के यांनी घेतली गणेश नाईक यांची भेट

नरेश म्हस्के यांनी घेतली गणेश नाईक यांची भेट
नरेश म्हस्के यांनी घेतली गणेश नाईक यांची भेट फोटो: ठाणे वैभव
ठाणे : ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के हे प्रचारा दरम्यान मान्यवरांच्या गाठीभेटी घेत आहेत. राज्याचे माजी मंत्री व ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांची नरेश म्हस्के यांनी सदिच्छा भेट घेतली. निवडणुकीतील विजयासाठी नरेश म्हस्के यांनी गणेशजी नाईक यांचे शुभाशीर्वाद घेतले. यावेळी माजी खासदार डॉ. श्री. संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक उपस्थित होते. निवडणुकीच्या अनुषंगाने यावेळी नरेश म्हस्के आणि गणेश नाईक यांच्यात चर्चा झाली. प्रचारसभा, चौक सभा, जाहीर सभेबरोबरच घरोघर जाऊन मतदारांपर्यंत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकारचे निर्णय पोहोचविले पाहिजेत. अबकी बार ४०० पार खासदार निवडून यायलाच हवेत अशी भूमिका उपस्थित सर्वांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475