जिल्हा

लोकसभेची हंडी नरेंद मोदीच फोडणार

लोकसभेची हंडी नरेंद मोदीच फोडणार
लोकसभेची हंडी नरेंद मोदीच फोडणार फोटो: ठाणे वैभव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास ठाणे : इंडिया आघाडीच्या माध्यमातून मोदींच्या विरोधात कितीही पक्ष एकत्र आले तरी लोकसभेची हंडी पंतप्रधान नरेंद्र मोदीच फोडणार आहेत, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात व्यक्त केला. ठाण्यातील टेंभी नाक्यावरील दिघे साहेबांच्या हंडीला मुख्यमंत्री शिंदे यांनी हजेरी लावली. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. दहीहांडीच्या निमित्ताने गोंविदा थर लावत आहेत, दुसरीकडे राज्यातही सरकार विकासाचे थर लावत असल्याचे त्यांनी सांगितले. आता अहंकाराचे थर कोसळले असून विकासाचे थर रचले जात असल्याचेही ते म्हणाले. देशात आणि राज्यात मोदी यांच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र येत असले तरी त्याचा काहीही परिणाम मोदींवर होणार नसून २०२४ ची लोकसभेची हंडी हे नरेंद्र मोदीच फोडतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार अतिशय गंभीर आहे. यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्यावेळी त्यांनी आरक्षण दिले होते. ते आरक्षण उच्च न्यायालयाने देखील अंतिम केले होते. परंतु महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे सुप्रीम कोर्टात ते रद्द झाल्याचे ते म्हणाले. उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे राज्याचा दौरा करीत असून निष्ठेची भाषा करीत असल्याबाबत त्यांना छेडले असता श्री.शिंदे म्हणाले, त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी आपली निष्ठा विकली, त्यातही बाळासाहेबांचे विचार विकणाऱ्यांनी निष्ठेची भाषा आम्हाला शिकवू नये, असा इशाराही त्यांनी दिला. सनातन धर्माला आजही अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे कितीही स्टॅलीन किंवा इतर कोणीही आले तरी सनातन धर्माला धक्का लागणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो. राज्यात आम्ही चांगले काम करत आहोत. उत्सवावर लादण्यात आलेली सर्व बंधने आम्ही काढून टाकली. यावर्षी आणखी जोरदार उत्सव साजरे करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. थर लावताना प्रत्येकाचा जीव महत्वाचा आहे, सरकारने यावेळी प्रो गोविंदा संकल्पना राबवून साहसी खेळात याचा समावेश आहे. गोविंदाची सुट्टी पण जाहीर केली, १० लाखांचा विमा देखील काढला, त्यामुळे सांघिक भावनेने उत्सव साजरा करा, या उत्सवाला गालबोट लागता कामा नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475