जिल्हा

ठाण्याच्या कारागृहात बागडणार 'नन्हे कदम'

ठाण्याच्या कारागृहात बागडणार 'नन्हे कदम'
ठाण्याच्या कारागृहात बागडणार 'नन्हे कदम' फोटो: ठाणे वैभव
महिला कैद्यांच्या मुलांसाठी बालवाडी उपक्रम ठाणे : ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात आता बच्चे कंपनीचा किलबिलाट ऐकायला येणार आहे. कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या महिला कैद्यांच्या मुलांसाठी 'नन्हे कदम' या बालवाडीचा शुभारंभ आज करण्यात आला. एखाद्या गुन्ह्यात शिक्षा झालेली आई कारागृहात असताना त्यांची मुले आता कारागृहातच शिक्षणाचे धडे गिरवणार आहेत. ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात सध्या जवळपास १४० महिला विविध गुन्ह्यात शिक्षा भोगत आहेत. त्यापैकी अनेक महिला कैद्यांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याने कारागृह प्रशासनाने प्रवेशद्वाराजवळ बालवाडी तसेच पाळणाघराची उभारणी केली आहे. कारागृहातील महिला कैद्यांसोबत असलेल्या वय वर्षे ३ ते ६ वयोगटापर्यंतच्या मुलांना कारागृहाच्या बाहेर सर्वसामान्य मुलाांप्रमाणे बालवाडीचा आनंद घेता येणार आहे. ठाणे कारागृहात सद्यस्थितीत महिला कैद्यांच्या चार मुलांनी आज अंगणवाडीत प्रवेश केला. अंगणवाडी झाल्यानंतर मुलांना संध्याकाळी पुन्हा त्यांच्या आईकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. तसेच ज्या महिला अधिकारी, कर्मचारी कारागृहात आपले कर्तव्य बजावत आहेत, त्यांच्या मुलांना घरी सांभाळ करण्यासाठी कोणी नाही अशा आठ मुलांना नन्हे कदम पाळणाघरात ठेवण्यात येणार असल्याची माहिती कारागृहाच्या अधिक्षक राणी भोसले यांनी दिली. शिक्षक, सहाय्यक महिलांची पूर्णवेळ नियुक्ती नन्हे कदम बालवाडी तसेच पाळणाघर सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. या बालवाडीकरीता आांगण संस्थेकडून १ शिक्षक, २ सहाय्यक महिला यांची पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली असून मुलांच्या मनोरंजन करता दूरदर्शन संच, खेळणी,शुद्ध पाण्याकरिता वॉटर प्युरिफायर, फ्रीज आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement 300x450

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement 300x600