जिल्हा

हातोहात दागिने लांबवणाऱ्या नणंद-भावजयीला अटक

हातोहात दागिने लांबवणाऱ्या नणंद-भावजयीला अटक
हातोहात दागिने लांबवणाऱ्या नणंद-भावजयीला अटक फोटो: ठाणे वैभव
दोघींवर राज्यभरात १६ गुन्हे दाखल डोंबिवली : डोंबिवलीतील ज्वेलर्सला बोलण्यात गुंतवून हातचलाखीने दागिने घेऊन पसार झालेल्या दोन महिलांना डोंबिवली रामनगर पोलिसांनी अटक केली. या दोघींवर राज्यभरात १६ गुन्हे दाखल आहेत. डोंबिवलीतील ज्वेलर्समधील चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. अटक केलेल्या दोघी नणंद भावजय असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार उषाबाई मकाळे आणि निलाबाई डोकळे असे अटक केलेल्या दोघींची नावे आहेत. या औरंगाबाद येथील रहिवासी आहेत. काही दिवसांपूर्वी डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ परिसरात विनायक ज्वेलर्स दुकानात या दोन अनोळखी महिला आल्या होत्या. या दोन महिलांनी दुकानमालक व कर्मचाऱ्यांना बोलण्यात गुंतवून हात चलाखीने दुकानांमधील दागिने चोरून पसार झाल्या. काही वेळाने दुकानदाराला लक्षात आले ही चोरी झाली आहे. या दोन महिलांना दुकानदाराने आजूबाजूला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र या महिला पसार झाल्या होत्या. दुकान मालकाने डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला. दुकानातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे या महिलांची ओळख पटली. पोलिसांनी दोन्ही महिलांना अटक केली आहे. उषाबाई मकाळे, निलाबाई डोकळे अशी या दोन्ही महिलांचे नाव असून या दोन्ही नणंद आणि भाऊजयी आहेत. या दोघी ज्वेलर्सचे दुकाने फिरून त्यांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने दुकानातील दागिने घेऊन पसार व्हायच्या. आपल्यावर कोणाचा संशय येऊ नये यासाठी दोघींचे राहणीमान साधे होते. डोंबिवलीमधील ज्वेलर्समध्ये चोरी करताना त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. दोन्ही महिलांविरोधात राज्यातील विविध पोलीस ठाण्यात तब्बल 16 गुन्हे दाखल आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475