जिल्हा

नमुंमनपाने सात महिन्यांत वसूल केला ५०० कोटींचा मालमत्ता कर

नमुंमनपाने सात महिन्यांत वसूल केला ५०० कोटींचा मालमत्ता कर
नमुंमनपाने सात महिन्यांत वसूल केला ५०० कोटींचा मालमत्ता कर फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या एप्रिल ते ऑक्टोबर या पहिल्या सात महिन्यांत तब्बल ५०० कोटींपेक्षा अधिक कर संकलन करून लक्षणीय कामगिरी केली आहे. कर संकलनात वाढ होण्यासाठी महानगरपालिकेने यंदा डेटा विश्लेषणावर आधारित नाविन्यपूर्ण पध्दतीने कार्यवाही करण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये करसंकलनात वाढ साध्य करण्यासाठी डेटा विश्लेषण, मालमत्ताधारकांची माहिती अद्ययावत करणे आणि जनजागृती मोहिमा राबविण्यात आल्या. या अंतर्गत माहितीचे सखोल विश्लेषण, कर संकलन मोहिमेचे धोरणात्मक नियोजन आणि माहिती संकलनासाठी विकसित केलेले मोबाईल ॲप्लिकेशन अशा सर्व घटकांच्या माध्यमातून करसंकलनात लक्षणीय वाढ झाली. ऑनलाईन करभरणा माध्यमातून ३१३ कोटी ७० लाख इतक्या मोठ्या प्रमाणात कर संकलन झाले. नमुंमपाच्या आठ विभागांतील एक लाख ६३०२३ मालमत्ताधारकांकडून ५०० कोटी ११ लाख रुपयांचे कर संकलन झाले. सर्वात जास्त मालमत्ता कर नेरूळ विभागातून १०६ कोटी ७९ लाख रुपये जमा झाला. ऑनलाईन माध्यमांतून ३१३ कोटी ७० लाख रुपये कर संकलन झाले. ऑफलाईन माध्यमांतून १८६ कोटी ४१ लाख रुपये कर संकलन झाले. निवासी मालमत्तेमधून ३५ टक्के कर संकलन झाले. अनिवासी/व्यावसायिक मालमत्तेमधून २३.८४ टक्के, औद्योगिक मालमत्तेमधून ३२.४५ टक्के तर मिश्र व इतर मालमत्तेमधून ८.७१ टक्के कर संकलन करण्यात आले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475