जिल्हा

नजीब मुल्ला राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी

नजीब मुल्ला राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी
नजीब मुल्ला राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी फोटो: ठाणे वैभव
ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते, ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला यांची, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सरचिटणीसपदी आणि महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाच्या निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नजीब मुल्ला यांना नियुक्तीपत्र प्रदान करताना महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आदी उपस्थित होते. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील नजीब मुल्ला यांचा वावर, तळागाळातील माणसांशी जोडलेली नाळ, जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्याची त्यांची हातोटी, यामुळे त्यांच्यावर या जबाबदाऱ्या देण्यात आल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा नजीब मुल्ला उंचावतील अशी अपेक्षा व्यक्त करत श्री.तटकरे यांनी शुभेच्छा दिल्या.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475