महाराष्ट्र

पॉवर लिफ्टिंगमध्ये बेलापूरच्या मुस्कानची उत्तुंग भरारी

पॉवर लिफ्टिंगमध्ये बेलापूरच्या मुस्कानची उत्तुंग भरारी
पॉवर लिफ्टिंगमध्ये बेलापूरच्या मुस्कानची उत्तुंग भरारी फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई : पॉवर लिफ्टिंग या पुरुषी मक्तेदारी समजल्या जाणाऱ्या क्रीडा प्रकारात बेलापूरच्या मुस्कान शेखने नेत्रदीपक कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले आहे. मुंबईतील वडाळा विभागात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत मुळची नवी मुंबई येथील असलेल्या मुस्कान शेख हिने चमकदार कामगिरी केली आहे. मुस्कानने आपल्या प्रतिकूल परिस्थितीत या यशाला गवसणी घातली आहे. मुस्कानने सबज्युनिअर गटातील ‘स्कॉट’ तब्बल ६० किलो वजन उचलत या कामगिरीसह सुवर्ण पदक पटकावले आहे. महाराष्ट्र राज्य, सब ज्युनियर, ज्युनियर, मास्टर पुरूष आणि महिला पॉवर लिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने वडाळा इथं या स्पर्धेचं नुकतेच आयोजन करण्यात आले होते. मुस्कानच्या चमकदार कामागिरीबद्दल तिचे कुटुंबिय आणि प्रशिक्षकही आनंदी आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475