जिल्हा

उत्तनमधील अनधिकृत बंगल्यांवर पालिकेची कारवाई

उत्तनमधील अनधिकृत बंगल्यांवर पालिकेची कारवाई
उत्तनमधील अनधिकृत बंगल्यांवर पालिकेची कारवाई फोटो: ठाणे वैभव
भाईंदर: अनधिकृत आलिशान बंगल्यांच्या बांधकामांची नगरी असलेल्या उत्तन गाव परिसरातील दोन अनधिकृत बंगल्यांच्या बांधकामावर महापालिकेच्या प्रभाग समिती क्र.१ च्या अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने तोडक कारवाई केली. आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. महापालिका प्रभाग समिती क्रमांक १ अंतर्गत उत्तन गाव परिसरातील न्यू रॉयल इंग्लिश हायस्कूल रोड, येडू कंपाऊंडमधील दोन बंगल्यांच्या अनधिकृत बांधकामावर जेसीबीच्या सहाय्याने तोडक कारवाई करण्यात आली. ही कारवाई उपायुक्त (अतिक्रमण) स्वप्निल सावंत यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. कारवाईदरम्यान दोन जेसीबी व आवश्यक मनुष्यबळ व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी प्रभाग समिती क्रमांक १ च्या सहायक आयुक्त दिपाली पवार तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. घटनास्थळी मोठ्या संख्येने जमाव जमला होता. मात्र पोलिस बंदोबस्त असल्याने कोणताही अनुचित प्रकार न घडता सदर कारवाई पार पडल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475