महाराष्ट्र

खा.म्हस्के लोकसभेत काँग्रेसवर बरसले

खा.म्हस्के लोकसभेत काँग्रेसवर बरसले
खा.म्हस्के लोकसभेत काँग्रेसवर बरसले फोटो: ठाणे वैभव
ठाणे: संसदेच्या पहिल्याच अर्थसंकल्पिय भाषणात ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के काँग्रेसवर बरसले. मागील अनेक वर्षात काँग्रेसने महाराष्ट्राला काय दिले असा प्रश्न उपस्थित करून केंद्र सरकारने राज्याला दिलेल्या निधीचा लेखाजोखा मांडला. आज श्री. म्हस्के यांनी संसदेत मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये अर्थशंकल्पिय भाषण केले. काँग्रेस फक्त टीका करत आहे, खोटी महिती पसरवत आहे. या अर्थसंकल्पामध्ये राज्याला सुमारे ७४ हजार कोटींचा निधी दिला आहे. त्याचबरोबर रोजगार देखिल तरुणांना मिळणार आहे. गरिबांना परवडणारी तीन कोटी घरे मोदी सरकार देणार आहे. राज्याला देखिल त्याचा वाटा मिळणार आहे, त्यामुळे विरोधी पक्षाने खोटी माहिती देऊ नये. यावेळी राज्यातील रेल्वेकरिता हजारो कोटींचा निधी दिला आहे, परंतु काँग्रेसने कधी असे भरभरून दिले होते का? असा सवाल श्री. म्हस्के यांनी उपस्थित करून काँग्रेस पक्षावर टीका केली. काँग्रेसला दहा वर्षानंतर विरोधी पक्ष नेतेपद मिळाले आहे. ते त्यांनी पुढील अनंत काळ सांभाळून ठेवावे, असा टोला मारून विरोधी पक्ष देश म्हणजे गांधी घराणे असे समजत असल्याची टीका केली. यावेळी खा. म्हस्के यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात कडक शब्दात टीका केली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव केला. पहिल्याच भाषणात त्यांनी चुणूक दाखवली असल्याने यापुढेही ते आक्रमक भूमिका घेतील, असे बोलले जात आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475