जिल्हा

प्रसृतीगृहातील माता नवजात बाळाची ताटातूट टळणार !

प्रसृतीगृहातील माता नवजात बाळाची ताटातूट टळणार !
प्रसृतीगृहातील माता नवजात बाळाची ताटातूट टळणार ! फोटो: ठाणे वैभव
शेठ लक्ष्मीचंद फतीचंद प्रसूतिगृहात १८ विशेष नवजात केअर युनिट ठाणे : शेठ लक्ष्मीचंद फतीचंद प्रसृतीगृहात नवजात बाळ कमी वजनाचे किंवा आजारी असेल तर त्यास कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलवले जात होते. त्यामुळे आई-बाळाची ताटातूट होत असे. आता कोपरीच्या या प्रसृतीगृहाला १८ एसएनसी युनिट मिळणार असल्याने ही ताटातूट टळणार आहे. महापालिकेच्या कोपरी येथील शेठ लक्ष्मीचंद फतीचंद प्रसूतिगृहात चार स्त्रीरोग तज्ज्ञांच्या नियुक्तीसह १८ विशेष नवजात केअर युनिट (एसएनसीयू) उभारण्यास महापालिकेने मंजूरी दिली आहे. या निर्णयामुळे वेळेआधी जन्म घेणाऱ्या व कमी वजनाच्या मुलांवर लगेचच उपचार सुरू करता येतील. या प्रसूतिगृहात `एनएनसीयू'साठी भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्याकडून महापालिकेकडे पाठपुरावा केला जात होता. कोपरी येथील शेठ लक्ष्मीचंद फतीचंद प्रसूतिगृह सुरू करण्यासाठी माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांच्याकडून विधान परिषदेचे तत्कालीन उपसभापती कै. वसंतराव डावखरे यांना विनंती केली होती. त्यांच्या निर्देशानंतर महापालिकेने कोपरीत प्रसूतिगृह सुरू केले होते. मात्र, या ठिकाणी `एनआयसीयू' युनिट सुरू केले नव्हते. त्यामुळे वेळेआधी व कमी वजनाच्या मुलांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलवावे लागत होते. तर काही गरीब पालकांना कर्ज काढून, नवजात मुलाला खासगी हॉस्पिटलमधील `एनआयसीयू' दाखल करावे लागत होते. काही वेळा पॅनलवरील डॉक्टर वेळेत न आल्यामुळे मुलांवरील उपचाराला अडचणी येत होत्या. या व्यथेबाबत भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांच्याकडून पाठपुरावा केला जात होता. महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेऊन लक्ष्मीचंद फतीचंद प्रसूतिगृहात विशेष नवजात केअर युनिट (एसएनसीयू) युनिट उभारण्याची मागणी करण्यात आली होती. अखेर या प्रयत्नांना यश आले असून, आयुक्त बांगर यांनी कोपरीतील `एसएनसीयू'साठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. या ठिकाणी चार स्त्री रोग तज्ज्ञांच्या नियुक्तीसह १८ `एसएनसीयू' युनिट उभारले जाईल, अशी माहिती भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांनी दिली. या निर्णयाबद्दल कोपरीतील महिलांनी आनंद व्यक्त करुन आभार मानले. लक्ष्मीचंद फतीचंद प्रसूतिगृहात मातेची प्रसूती झाल्यानंतर कमी वजन व आजारी नवजात बालकांना छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये हलविले जात होते. त्यावेळी माता कोपरीत, तर लेक कळव्याला अशी स्थिती निर्माण होत होती. अशा परिस्थितीत मातेच्या जीवाची घालमेल होत होती. तर नातेवाईकांची दोघांची काळजी घेताना धावपळ उडत होती. कोपरीत नव्या`एसएनसीयू' युनिटमुळे माय-लेकाची ताटातूट टळणार आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475