जिल्हा

मीरा-भाईंदर महापालिका शाळेतील मुलींना मासिक उपस्थिती भत्ता

मीरा-भाईंदर महापालिका शाळेतील मुलींना मासिक उपस्थिती भत्ता
मीरा-भाईंदर महापालिका शाळेतील मुलींना मासिक उपस्थिती भत्ता फोटो: ठाणे वैभव
भाईंदर: महिला व बालकल्याण विभागामार्फत महानगरपालिकेच्या शाळेतील हजेरीपटावर नोंदणी असलेल्या व शाळेत नियमित उपस्थित राहणाऱ्या इयत्ता ८ वी ते १० वी मधील मुलींना मासिक ३०० रुपये उपस्थिती भत्ता लागू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. महानगरपालिका शाळेतील इयत्ता ८ वी ते १० वी मधील मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे व पालकांनी आपल्या मुलींना नियमित शाळेत पाठवावे या हेतूने प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मासिक उपस्थिती भत्ता लागू करण्यात येत आहे. योजनेचा लाभ माध्यमिक शाळेतील इयत्ता ८वी ते १०वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलीकरिता अनुज्ञेय राहील. शैक्षणिक वर्षातील एकूण शाळेतील उपस्थित दिवसांच्या मर्यादेमध्ये साधारणतः एकूण २२० दिवसांच्या उपस्थितीनुसार प्रती लाभार्थी प्रति महिना ३०० रुपये इतका उपस्थिती भत्ता लागू राहील. कल्याणकारी योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांना मिळणेकरिता डीबीटीच्या मार्गदर्शक तत्वानुसार लाभार्थ्यांच्या खात्यावर सदरची रक्कम जमा करण्यात येईल. मुलींची शाळेतील उपस्थिती वाढविण्याकामी माहे. ऑगस्ट २०२५ ते जुलै २०२६ या एक वर्षाच्या कालावधीकरीता प्रायोगिक तत्तवावर ही योजना राबविण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475