जिल्हा

रस्त्यावरचे क्षण रांगोळीत उतरले

रस्त्यावरचे क्षण रांगोळीत उतरले
रस्त्यावरचे क्षण रांगोळीत उतरले फोटो: ठाणे वैभव
ठाणे: रस्त्यावरून जात असताना अनेकदा काही घटना, क्षण आपल्याकडून दुर्लक्षित होतात. नेमक्या याच गोष्टी, प्रसंगांना रांगोळीच्या माध्यमातून चंपाषष्ठी उत्सवानिमित्ताने श्री आनंद भारती समाज आणि कलाछंद रांगोळीकार कलाकार आयोजित १६ व्या रंगावली प्रदर्शनात उजाळा दिला आहे. सोळाव्या वर्षानिमित्ताने रस्त्यावर घडणाऱ्या १६ घडामोडींना या प्रदर्शनात स्थान देण्यात आले आहे. प्रदर्शनाची सुरुवात १२ वर्षीय नियती मुकादम हिने पहिल्यांदाच रेखाटलेल्या श्री गणेशाय नमः ने होते. त्यानंतर मासे विकणारी कोळीण (राजन शिरोडकर), भयभीत झालेली मुलगी (हिंदवी तरे), महिला मजूर कामगार (निलेश कोळी), मुंबईचा डबेवाला (उमेश सुतार), रस्त्यावर भविष्य सांगणारा ज्योतिष (अमित सावंत), फुगे-खेळणी विक्रेती मुलगी, माकडवाला मदारी (दोन्ही सुभाष शाक्यावार), इडली-मेदुवडा विक्रेता (बबन राणे), भाजी विक्रेता (अनिरुद्ध जाधव), फळ विक्रेती (योगेश भामणे, फळ विक्रेती (गोविंद सोनवणे, चहावाला (मयंक थोरात), नदी बैलवाला (सुनील मोरे) आदी व्यक्तिरेखा पहायला मिळतात. २६ नोव्हेंबरपर्यंत संध्याकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत हे प्रदर्शन विनामूल्य पाहता येणार आहे. क्रिकेटपटू आणि सिनेकलावंत संदीप जुवाटकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. या कलाकृतींना तोड नसल्याचा अभिप्राय जुवाटकर यांनी यावेळी दिला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष हरेश्वर मोरेकर, कलाछंद रांगोळीकार मंडळाचे अध्यक्ष सुभाष शाक्यवार उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475