जिल्हा

मनसेच्या अविनाश जाधवांचे ठाणेकरांना साकडे

मनसेच्या अविनाश जाधवांचे ठाणेकरांना साकडे
मनसेच्या अविनाश जाधवांचे ठाणेकरांना साकडे फोटो: ठाणे वैभव
ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार अविनाश जाधव यांनी मंगळवारी सकाळी ठाणे रेल्वे स्थानकात हटके प्रचार केला. "ठाणेकरांनो एकदा मला संधी द्या ! अशा आशयाचे फलक हाती घेऊन अविनाश जाधव यांनी ठाणेकरांना साकडे घातले. यावेळी रेल्वे प्रवाशांशी संवाद साधुन अविनाश जाधव यांनी रेल्वे संदर्भात समस्या जाणुन घेतल्या. दरम्यान, अविनाश जाधव यांच्या हटके प्रचाराची रेल्वे प्रवाशांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. भारतात पहिली रेल्वे बोरीबंदर (मुंबई) ते ठाणे स्थानकादरम्यान धावली. अशा या ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज लाखो प्रवासी नोकरी आणि व्यवसायानिमित्त प्रवास करतात. ठाणे स्थानकाचा पश्चिमेकडील भाग ठाणे शहर विधानसभा क्षेत्रात येत असल्याने स्टेशन परिसर ते नौपाडा, जुने ठाणे या भागात नेहमीच वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे ठाणे स्थानक परिसरात मुबलक पार्किंग सुविधांसह या भागाचा सुनियोजित विकास होणे गरजेचे असल्याचे मत प्रवाश्यांनी यावेळी व्यक्त केले. त्यावर अविनाश जाधव यांनी "एकदा मला संधी द्या" असे नम्र आवाहन ठाणेकरांना केले. आज सकाळी प्रचार करताना रेल्वेने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांमध्ये अविनाश जाधव यांची क्रेझ पाहायला मिळाली. विशेष म्हणजे तरुणांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. यावेळी महिला,तरुण वर्गाला जाधव यांच्या सोबत सेल्फी काढण्याचा मोह काही आवरला नाही. तसेच येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान करण्याचा विश्वास मतदारांनी व्यक्त केला. ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक १ व २ समोरील सॅटीस पुलाखाली अविनाश जाधव यांनी मंगळवारी सकाळी ८ वाजता प्रवाशांसोबत संवाद साधला. याप्रसंगी, मनसेचे नेते अभिजित पानसे, मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे, ठाणे महिला अध्यक्षा समिक्षा मार्कंडे आदींसह शेकडो महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475