जिल्हा

मनसेने खड्ड्यात झाडे लावून ठामपाचा केला निषेध

मनसेने खड्ड्यात झाडे लावून ठामपाचा केला निषेध
मनसेने खड्ड्यात झाडे लावून ठामपाचा केला निषेध फोटो: ठाणे वैभव
ठाणे: वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या ठाणेकरांना आता रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. निकृष्ट दर्जाची कामे आणि भ्रष्टाचारामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याच्या निषेधार्थ आज मनसेने खड्ड्यात झाडे लावून महापालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात नैनेश पाटणकर, संदिप साळुंखे, संजय भुजबळ स्वप्नील बोराडे आदींनी भाग घेऊन महापालिका प्रशासनाचा तीव्र निषेध केला. शहरातील सर्व धोकादायक खड्डे तत्काळ आणि दर्जेदार पद्धतीने बुजवावेत. अन्यथा नागरिकांच्या सहभागातून यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशारा मनसेने दिला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475