जिल्हा
मनसेच्या विभाग अध्यक्षासह शाखाध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश
मनसेच्या विभाग अध्यक्षासह शाखाध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: दिवा शहरात सुरू असलेल्या १६व्या दिवा महोत्सवात नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत उबाठा गटातील विभागप्रमुखासह २०० पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.
मनसेचे विभाग अध्यक्ष सोपान जाधव यांनी काही शाखा अध्यक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शाखाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शहरप्रमुख, माजी उपमापौर रमाकांत मढवी यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
दिवा शहरात खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत, शिवसेना शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्या विकासाच्या दूरदृष्टी वर प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सोपान जाधव यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक अमर पाटील, दीपक जाधव, नगरसेविका दर्शना म्हात्रे, दिपाली भगत, युवतीसेना शहर अधिकारी साक्षी मढवी, विभागप्रमुख उमेश भगत, विनोद मढवी, चरणदास म्हात्रे, निलेश पाटील, गुरुनाथ पाटील, शशिकांत पाटील, जगदीश भंडारी, अरुण म्हात्रे, सचिन चौबे, राजेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475