जिल्हा

कचऱ्याने भरलेल्या नाल्यात मनसेची बॅटिंग

कचऱ्याने भरलेल्या नाल्यात मनसेची बॅटिंग
कचऱ्याने भरलेल्या नाल्यात मनसेची बॅटिंग फोटो: ठाणे वैभव
कल्याण पश्चिमेतील जरीमरी नालेसफाईची पोलखोल कल्याण: कल्याण पश्चिमेतील स्टेशन परिसरातील जरीमरी नाल्यात कचरा साचल्याने या नाल्याला डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या कचऱ्यात क्रिकेट खेळत मनसेने कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नालेसफाईची पोलखोल केली आहे. पावसाळा तोंडावर आला असून कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात अद्याप मोठ्या नाल्यांच्या सफाईला सुरवात न झाल्याने या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. लवकरात लवकर नालेसफाई न झाल्याने महापौर दालनात कचरा टाकण्याचा इशारा मनसेचे विभाग अध्यक्ष कपिल पवार यांनी दिला आहे. पॅनल क्र. ९ मल्हारनगर परिसरातील गणेश नगर, जोशी बाग, जरीमरी तसेच झुंजारराव मार्केट येथून जाणारा मोठा नाला कचऱ्याने पूर्णपणे भरला आहे. आधी या नाल्यात जेसीबी किंवा पोकलेनद्वारे सफाई होत होती. परंतु नाल्यावरील अनधिकृत बांधकामामुळे ही सफाई गेल्या दोन ते तीन वर्षांपासून शक्य होत नाही. पुढील महिन्यात पावसाळा सुरू होत असून अजूनही नालेसफाईला सुरुवात झालेली नाही. नाले वेळेवर साफ न झाल्याने जोशीबाग, मल्हार नगर, गणेश नगर, चिखले बाग या परिसरात पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर मोठा नाला तसेच प्रभागातील अंतर्गत लहान नाले तातडीने साफ करावेत. मोठा नाला बंदिस्त करण्याचे किंवा वर स्लॅब टाकण्याचे काम बऱ्याच ठिकाणी चालू आहे. मोठ्या नाल्यावर स्लॅब टाकण्यास मनसेचा विरोध असून नालेसफाई लवकरात लवकर न झाल्यास नाल्यातील कचरा महापौर दालनात टाकण्याचा इशारा मनसेने दिला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475