जिल्हा

मीरारोड स्कायवॉक बनला शाॅपिंग माॅल!

मीरारोड स्कायवॉक बनला शाॅपिंग माॅल!
मीरारोड स्कायवॉक बनला शाॅपिंग माॅल! फोटो: ठाणे वैभव
भाईंदर : मीरारोड रेल्वे स्थानकालगत असलेला मीरा रोड (पूर्व) स्काय वाॅक देखभालीअभावी अत्यंत दुरावस्थेत असून येथे अनधिकृत फेरीवाले आणि दुकाने थाटली गेल्यामुळे या स्कायवॉकला मॉलचे स्वरूप आले आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनाकडून या स्कायवॉकच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. तुटलेल्या पायऱ्या, अस्वच्छता, भटक्या कुत्र्यांचा वावर आणि सुरक्षेचा अभाव यामुळे पादचारी प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मागील वर्षी मीरारोड रेल्वे स्थानकालगत असलेल्या शांती शाॅपिंग सेंटरमध्ये रात्रीच्या वेळेस गोळीबार होऊन एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. परिसरातील पदपथ व रस्त्यावर अनधिकृतपणे ठाण मांडून बसणाऱ्या विक्रेत्यांकडून होणाऱ्या वसुलीप्रकरणी ही हत्या झाल्याचे उघड झाले होते. त्यानंतरही परिसरातील अनधिकृत विक्रेत्यांची संख्या कमी न होता वाढतच आहे. काही आठवड्यापूर्वी लोढा काॅम्प्लेक्स बाणेगर बस थांबा परिसरातील अनधिकृत विक्रेत्यांनी एका वाहनचालकाला वाहन थांबविल्याबाबत धमकावले. त्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी सदर रस्ता फेरीवालामुक्त केला. आता मीरारोड रेल्वे स्थानक परिसरातील स्काय वाॅकवर बस्तान थाटले असून स्कायवॉकचे अवजड आच्छादन पत्रे उखडून विक्री साहित्य प्रदर्शन सुरू केले आहे. सकाळी व संध्याकाळी ऐन प्रवासी रहदारीच्या वेळेस या अनधिकृत विक्रेत्यांनी थाटलेल्या दुकानांच्या अडथळ्यांचा त्रास प्रवाशांना भेडसावत आहे. रस्त्यावर ठेवलेल्या विक्री साहित्य अडथळ्यांना चुकवून लोकल गाठावी लागत आहे. महापालिका अधिकारी व पोलीस प्रशासनाने या अनधिकृत फेरीवाल्यांचा बंदोबस्त करुन स्कायवॉक फेरीवालामुक्त करण्याची मागणी होत आहे.

संबंधित बातम्या

Advertisement 300x450

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement 300x600