जिल्हा
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नऊ वेश्याव्यवसाय दलालांना अटक
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नऊ वेश्याव्यवसाय दलालांना अटक
फोटो: ठाणे वैभव
वसई : बांग्लादेशातून पळवून आणलेल्या १२ वर्षाच्या मुलीला वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले असून तिच्यार तीन महिन्यात २०० जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने या मुलीची सुटका केली आहे. याप्रकरणी नऊ जणांना अट करण्यात आली असून त्यात चार बांग्लादेशी नागरिकांचा समावेश आहे.
२६ जुलै रोजी नायगाव पूर्वेच्या स्टार सिटी येथून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने १२ वर्षीय बांगलादेशी मुलीची सुटका केली होती. एक्सोडस रोड इंडिया फाउंडेशन आणि हार्मोनी फाउंडेशन यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली होती. सुटका झालेल्या १२ वर्षीय बांगलादेशी मुलीने धक्कादायक खुलासा केला आहे. तिच्यावर गुजरात नाडीयाड यासह अन्य ठिकाणी तीन महिन्यांत २०० हून अधिक पुरुषांनी लैंगिक अत्याचार केल्याचे तिने सांगितले असल्याचे चौकशीत समोर आले आहे.
या प्रकरणी नायगाव पोलिसांनी आतापर्यंत नऊ दलालांना अटक केली आहे. यात मोहम्मद खालिद बापरी (३३), जुबेर हारून शेख (३८), शमिम सरदार (३९), रुबी बेगम खालिद (२१) या चार बांग्लादेशी घुसखोरांचा समावेश आहे. उज्जल कुंडू (३५), परवीन कुंडू (३२) हे विरारच्या आगाशी येथे राहणारे आहेत. प्रीतिबेन मोहिडा (३७) आणि निकेत पटेल (३५) हे गुजराथचे दलाल आहेत. सोहेल शेख (२३) हा दलाल आहिल्यानंगरचा आहे.
एन.जी.ओ. आणि पोलिसांनी सुटका केल्यानंतर पीडित मुलीला उल्हासनगर येथील बाल कल्याण समितीच्या ताब्यात दिले आहे. मुलीच्या कुटुंबियांशी संपर्क झाला आहे. तिचे पारपत्र आणि व्हिजा तयार करून लवकरच तिच्या कुटुंबियांकडे सुपूर्द केले जाणार असल्याची माहिती नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजित मडके यांनी दिली.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475