जिल्हा
मिलिंद पाटणकर यांची नाराजी दूर
मिलिंद पाटणकर यांची नाराजी दूर
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ठाणे महापालिकेतील भाजपचे ज्येष्ठ माजी नगरसेवक मिलिन्द पाटणकर यांनी उमेदवारी अर्ज भरण्याचा घेतलेला निर्णय मागे घेतला आहे.
आमदार संजय केळकर यांना भाजपा, शिवसेना, रिपाइं महायुतीकडून ठाणे शहर मतदारसंघातील उमेदवारी मिळाली असून त्यांच्या प्रचाराने वेग घेतला आहे. दरम्यान भाजपचे ज्येष्ठ माजी नगरसेवक मिलिन्द पाटणकर यांनी उमेदवारी न मिळाल्याने नाराजी व्यक्त करत नामनिर्देशन पत्र खरेदी करून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान भाजपतील ज्येष्ठ नेत्यांनी त्यांची योग्य समजूत काढल्याने त्यांचे समाधान झाले आहे. त्यामुळे त्यांनी अर्ज भरण्याचा निर्णय मागे घेतला आहे. गेली २५ वर्षे पक्षाचा सच्चा कार्यकर्ता म्हणून काम केले असून या निवडणुकीतही मी काम करेन असे पाटणकर यांनी स्पष्ट केले.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475